STUDENTS PORTAL

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या लिंक

MAHARASHTRA VIDYALAAYA MOHA

महाराष्ट्र विद्यालय मोहा

महाराष्ट्र विद्यालय मोहा ता परळी वै जि बीड ही शाळा सिरसाळा या ठिकाणापासून 11 की अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेली अतिशय उपक्रमशील शाळा आहे , या ठिकाणी ऊसतोड कामगार पाल्य ,गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते प्रवेश चालू आहेत

सुविचार

🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा. 

🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे …बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.

कारण..पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..             🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे..”                                 

  🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्…भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. 

🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन.

सुविचार

महत्त्वाच्या बातम्या

वर्ग नववी व दहावीच्या शाळा सुरू होताच टेक्नॉलॉजीचे शिक्षण देणे आवश्यक

दिनांक 6 जुलै 2020 पासून बीड जिल्ह्यात इयत्ता नववी व दहावी वर्गाच्या शाळा सुरू होत आहेत. आपणास माहीतच आहे की 22 मार्च पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे शाळांना सुट्टी होती परंतु बीड जिल्हा परिषद व व शिक्षण विभाग यांनी दिनांक 6 जुलै 2020 पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे हि सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता,…

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन

‘शाहू’ : शैक्षणिक क्रांतीचे जनक शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन…

Design a site like this with WordPress.com
Get started